तलाठी भरती मराठी संपूर्ण महिती 2023
नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वीच तलाठी भरतीसाठी जाहिरात निघालेली आहे , आणि या जाहिरातीमध्ये सर्वच माहिती आहे. आज आपण तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तलाठी भरती मध्ये पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, आणि परीक्षा कशा स्वरूपाची असणार आहे या सर्वच विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर आपण माहिती कडे वळूया.
तलाठी भरती ही परीक्षा जिल्हा निवड समिती मार्फत घेतली जाते . मित्रांनो जिल्हा धिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती असते यातूनच तलाठी हे पद गट क यासाठी ही परीक्षा होणार आहे. तलाठी गट क या रिक्त पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे. मित्रांनो या परीक्षेसाठी जर तुम्हाला पात्र व्हायचे असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे कारण यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. दरवर्षी अशा भरत्या होत राहतात आणि पदवीधर युवक आणि युती यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरतात आणि परीक्षा देतात.
सध्याच्या काळामध्ये सर्वच उमेदवारांना सरकारी नोकरी हवी असते. तर त्यासाठी आता उमेदवारांकडे एक सुवर्णसंधी आहे ही नोकरी मिळवण्याची. कारण संधी वेळोवेळी येत नसते. त्यासाठी आपल्याला फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यानंतर आपण परीक्षा देण्यासाठी पात्र होतो.
चला तर मित्रांनो पुढे पाहूया यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणे गरजेचे आहे.
शैक्षणिक पात्रता किती पाहिजे ?
मित्रांनो आपल्याला अर्ज करण्यासाठी आपल्याकडे विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करत आहे अशांना मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
संगणक माहिती तंत्रज्ञान विषयी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच MS – CIT असणे आवश्यक आहे.
यासाठी आपल्याकडे मराठी किंवा हिंदी विषयांचा समावेश माध्यमिक शाळांत परिषद असायला हवा. अशा सर्व पात्रता अटी आहेत .
तलाठी भरतीसाठी वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ?
जे अर्जदार यासाठी अर्ज करत असतील त्यांचे वय ज्या दिवशी पासून जाहिरात निघाली त्या दिवस पासून 18 वर्षापेक्षा कमी आणि 33 वर्षापेक्षा जास्त नसावे. मित्रांनो यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना थोडी सूट असणार आहे त्यांची वयोमर्यादा 38 वर्षे अशी राहील. यामध्ये जाहिरातीत अधिक माहिती दिलेली आहे. मित्रांनो ज्या दिवसापासून जाहिराती प्रसिद्ध झाली त्या दिवसापासून 50 ते 60 दिवसांवर याची परीक्षा असते. विद्यार्थी मित्र या आधीपासूनच अभ्यास करतात तर त्यांचे गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादीमध्ये नाव मिळवू शकतात.
या तलाठी भरतीसाठी लाखो विद्यार्थी अर्ज करतात आणि परीक्षेमध्ये स्पर्धा पण तेवढीच असते. तर मित्रांनो आता यासाठी कोणत्याही प्रकारची तोंडी परीक्षा होणार नसून फक्त लेखी परीक्षा आहे आणि यावरच याची गुणवत्ता यादी लागण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास चांगला करायला हवा. यासाठी विद्यार्थी मित्रांना किमान 45 टक्के गुण या परीक्षेत मिळणे गरजेचे आहे तरच ते गुणवत्ता यादीमध्ये येतील.
तलाठी भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे ?
यासाठी आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे यासाठी स्वतःचा ईमेल आयडी असणे आवश्यक आहे तो असेल तरच आपण या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. अर्ज नीटपणे भरून झाल्यावर एक वेळ नीटपणे पाहून घ्यावा काही चुकले असेल तर बरोबर करावे. त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करावे. आपण जो अर्ज भरला आहे त्याची एक प्रत आपल्याला आपल्या ई-मेल अकाउंट वर पाहायला मिळेल.
चला तर मित्रांनो पुढे पाहूया यासाठी निवड कशी होते .
तलाठी भरती जिल्हा निवड समितीमार्फत घेतली जाते .
प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत असते.
आता निवड समितीमार्फत तलाठी गट क या पदासाठी जाहिरात निघालेली आहे ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
यानंतर मित्रांनो आता तुमचे एक लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. यातून जास्तीत जास्त मार्क्स असणाऱ्या उमेदवारांची मेरिट लिस्ट लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मेरिट लिस्ट ही वेगळी वेगळी लागते. तर अशा पद्धतीने याची निवड प्रक्रिया होते.
पुढे पाहूया यासाठी अभ्यासक्रम कशा प्रकारे असणार आहे.
नाही परीक्षा लेखी स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे आणि ही परीक्षा बहुपर्यायी वास्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे . यामध्ये एकूण शंभर प्रश्न असणार आहे एका प्रश्नाला प्रत्येकी दोन गुण राहणार आहेत अशी पूर्ण मिळून 200 गुण संपूर्ण पेपरला असतील. परीक्षेचा कालावधी हा दोन तासाचा असणार आहे. उमेदवाराला पेपर सोडवण्याकरिता दोन तास दिले जाणार आहेत.
यामध्ये मराठी विषयाकरिता 25 प्रश्न असणार आहेत त्यासाठी 50 गुण दिले जातील.
इंग्रजी विषयाकरिता 25 प्रश्न असणार आहेत त्यासाठी 50 गुण दिले जातील.
सामान्य ज्ञान या विषयासाठी 25 प्रश्न असणार आहेत 50 गुण दिले जातील .
अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी 25 प्रश्न असणार आहेत आणि 50 गुण दिले जाणार आहेत.
तर अशा प्रकारे या परीक्षेसाठी अभ्यासक्रम असणार आहे.
धन्यवाद !