What Do After 10 th Class | दहावी नंतर काय करावे?

दहावी नंतर काय करावे

नमस्कार मित्रांनो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत ती म्हणजे दहावीनंतर काय ? सर्वच विद्यार्थ्यांना जवळपास प्रश्न पडतो की आता तर आपली दहावी संपली आहे आता नंतर काय करावे ? हाच प्रश्न मुलांसोबतच मुलांच्या पालकांना सुद्धा पडतो की आता नेमकं काय कराव जाने मुला मुलींचे भविष्य घडले आणि त्यांना भविष्यामध्ये नोकरी मिळेल .

तर मित्रांनो आज आपण यावरच माहिती पाहणार आहोत की नेमकं दहावी पुढे आपण कोण कोणत्या फिल्ड मध्ये जाऊ शकतो आणि नवनवीन शिकू शकतो. दहावीनंतर खूप मोठे ऑप्शन्स आपल्याकडे असतात. पण मित्रांनो आपण आपली रुची कशामध्ये आहे हे ठरवून पुढे जायला हवे . कारण यामध्ये तुमच्या मनाची रुची असेल तर तुम्ही कोणत्याही ठिकाणी अव्वल नंबर वर राहाल.

चला तर मग मित्रांनो पुढे पाहूया दहावी नंतर आपण काय करू शकतो..
दहावीनंतर आपण जे क्षेत्र निवडतो त्यावरच आपलं करिअर सुद्धा डिपेंड असते. कारण एक मार्ग निवडला तर आपल्याला तो शेवटपर्यंत घेऊन जातो त्यासाठी आपल्याला खूप विचार करावा लागतो आणि मग डिसिजन घ्यावे लागते.

मित्रांनो आपण दहावीनंतर पुढील गोष्टींमध्ये जाऊ शकतो आणि आपलं करिअर घडू शकतो.

अकरावी बारावी

मित्रांनो सर्वप्रथम आपण दहावी वरच आता अकरावी बारावी करू शकतो.
मित्रांनो दहावीनंतर अकरावी बारावी करून मग पुढील शिक्षण शिकणे हे खूप पारंपारिक पद्धत आहे. आणि हा चांगला पर्याय आहे कारण याने आपल्याला ज्ञान मिळूनच आपली प्रगती होते आणि बारावीनंतर ग्रॅज्युएशन साठी आपल्याला ऍडमिशन घेता येते . याने आपली शिक्षणाची वाढ ही खुंटत नाही. आपण ज्ञानही ग्रहण करून पुढील शिक्षण घेऊ शकतो.

यानंतर अकरावी बारावी साठी आपण विज्ञान मध्ये प्रवेश घेऊ शकतो, यामध्येच आपण कलेसाठी सुद्धा प्रवेश घेऊ शकतो.
यामध्ये आपण वाणिज्य कॉमर्स साठी सुद्धा प्रवेश देऊ शकतो, जर आपल्याला तांत्रिक मध्ये रुची असेल तर आपण टेक्निकल सुद्धा घेऊ शकतो. अकरावी बारावी साठी आपल्या जवळ एवढे पर्याय उपलब्ध आहेत.

आयटीआय अभ्यासक्रम

मित्रांनो दहावीनंतर खूप लोकप्रिय फिल्ड म्हणजेच आयटीआय. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेड आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या आवडीच्या सहाय्याने आपण ट्रेड घेऊन यामध्ये शिक्षण पूर्ण करू शकतो. यामधून आपल्याला रोजगारही चांगला उपलब्ध होतो.
आयटीआय अभ्यासक्रमातून आपल्याला बरेचसे शिकायला सुद्धा मिळते. आणि विद्यार्थी आयटीआय करून नोकरी सुद्धा मिळू शकतात. मध्ये पुढील ट्रेड उपलब्ध आहेत.

आयटीआय प्लंबर, आयटीआय इलेक्ट्रिशियन, आयटीआय वेल्डर,आयटीआय मेकॅनिकल, आयटीआय टर्नर . त्या पद्धतीची तुम्ही ट्रेड घेऊन यामध्ये शिक्षण पूर्ण करू शकता.

डिप्लोमा

दहावीनंतर तुम्ही डिप्लोमा सुद्धा करू शकता . मित्रांनो इंजीनियरिंग असेल पॉली असेल यामध्ये मोठ्या प्रमाणावर डिप्लोमा उपलब्ध आहेत याचाच विचार करून तुम्ही डिप्लोमा सुद्धा करू शकता.

उद्योजक व्हा.

मित्रांनो दहावीनंतर तुम्ही उद्योजक सुद्धा होऊ शकतात. सर्वच विद्यार्थी शिक्षणाकडे नोकरीच्या दिशेने पाहत नाही त्यांना काहीतरी मोठं करण्याची इच्छा असते तर त्यांनी उद्योजक बनण्याचा विचार सुद्धा करू शकता. मित्रांनो जर तुम्हाला उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्याकडे भरपूर अशा संधी उपलब्ध आहेत. फक्त तुम्हाला आत्मविश्वास हवा आणि चांगल्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार हवा तर तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता.

मित्रांनो जे विद्यार्थी खाजगी किंवा शासकीय शिक्षण घेतात ते विद्यार्थी फक्त नोकरीचा विचार करतात त्यामुळे तुम्हीही उद्योजक बनवून त्यांना नोकरी देऊ शकता. आपल्याला भरघोस असा यशही मिळेल आणि इतरांना कामही मिळेल.

फाईन आर्ट्स परफॉर्मिंग आर्ट्स

बहुतेक विद्यार्थ्यांचा आवडता असणारा विषय म्हणजे फाईन आर्ट्स आणि परफॉर्मिंग आर्ट्स आहे. विद्यार्थी मनावर न जाता कोणत्या दुसऱ्या फील्डला ऍडमिशन घेतात आणि त्यांची रुची आर्ट्स मध्ये असते. मित्रांनो यामध्येही करिअर होऊ शकतं. यासाठी आपल्याला या विषयांमध्ये आवड असणे गरजेचे आहे आणि यासाठी कौशल्यही लागतं. ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये लहानपणापासून आवड असेल त्यांनी हे नक्कीच करायला हवेत तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन्स आहेत आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये जाऊ शकतो .
मला तुमच्या उज्वला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद!

Leave a Comment